अभाविपने तर्फे २०० मी ऐतिहासिक अखंड तिरंगा यात्रा

    दिनांक :16-Aug-2019
पवनी, 
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नगरीमध्ये पावनिवासीयांना २०० मीटर अखंड तिरंगा यात्रेचे दर्शन घडविले . शहरात सर्वच शाळेत, शासकीय कार्यालयात, निमशासकीय कार्यालयात झेंडावंदन होत असते परंतु समाजाला कोणत्या प्रकारे देशभक्तीचा एक संदेश म्हणून विद्यार्थ्यांच्या मार्फत जनतेला देता येईल त्या हेतूने या तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते .त्यामध्ये शहरातील संपुर्ण महाविद्यालयातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या यात्रेची सुरुवात शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विजय लेपसे यांच्या हस्ते होऊन नाना-नानी पार्क मार्गे शिवाजी चौक-गांधी चौक-आझाद चौक-तुकडोजी चौक-बाजार चौक-आंबेडकर चौक येथून दर्शन घडविताना नगरातील सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले व राजीव गांधी सभागृहामध्ये विलास काटेखाये यांनी या अखंड तिरंगा यात्रेचे समापन केले व अभाविप कडुन उपस्थित विद्यार्थाना भोजन देवून गांधी चौक येथे महाप्रसाद देण्यात आले. सर्व पवनी वासियांनी तिरंगा यात्रेचे स्वागत केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे ही वर्षातील ३६५ दिवस शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असते व यापुढेही असेच कार्य करत राहिल अशी ग्वाही अभाविपच्या कार्यकर्तानी दिली. या अखंड तिरंगा यात्रेचे आयोजन संपूर्ण अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व डिजे स्कुप तलमले ब्रदर्स यांनी केले.