‘हा’ ठरला जगातील सर्वात हॅन्डसम मॅन

    दिनांक :17-Aug-2019
अनेक बॉलिवूड चित्रपट आजही परदेशात आवर्जुन पाहिले जातात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता हृतिक रोशनने भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. हृतिकने त्याचा लूक, डान्स आणि बॉडीने अनेकांची मने जिंकली आहेत. त्याचे भारतातच नव्हे तर भारताबाहेरही असंख्य चाहते आहेत. त्यामुळे हृतिकने ऑगस्ट २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टॉप ५ मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’च्या यादीमध्ये नाव कमावले आहे. ही यादी अमेरिकेमधील मनोरंजन क्षेत्रातील एका कंपनीने प्रदर्शित केली आहे.
 
 
 
या यादीमध्ये जगातील सर्वात हॅन्डसम आणि गूड लूकींक मेन्सचा समावेश आहे. भारतीय अभिनेता हृतिक रोशनने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले असून अभिनेता क्रिस इव्हान्स, अभिनेता डेव्हिड बेकहॅम, अभिनेता रॉबर्ट पॅटीन्सन आणि अभिनेता उमर बोरकान अल गाला यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. हृतिकच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.
नुकताच हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर चांगली कमाई केली. विकास बहल यांनी ‘सुपर ३०’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ३० मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी गणितज्ञ आनंद कुमार यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट आनंद कुमार यांनी गरीब मुलांना शिकवण्यासाठी घेतलेल्या कष्टांची आणि मेहनतीची कथा आहे.
आता लवकरच हृतिक अभिनेता टायगर श्रॉफसह ‘वॉर’ चित्रपटात दिसणार होत. अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यामधील ऑनस्क्रीन टक्कर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.