'मिशन मंगल'ची झेप ४५ कोटींवर

    दिनांक :17-Aug-2019
मुंबई:
स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेला 'मिशन मंगल' बॉक्स ऑफिसवरही मोठी झेप घेतोय. पहिल्या दिवशी जोरदार कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली आहे. दुसऱ्या दिवशी सिनेमाने १६.७५-१७ कोटींचं कलेक्शन केलं आहे. दोन दिवसांची एकूण कमाई ४५ कोटी रुपये आहे.

पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशीच्या कमाईत ४० टक्के घट झाली आहे. मात्र पहिल्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने साहजिक सिनेमा पहायला गर्दीही जास्त होती. मुंबईत दुसऱ्या दिवशी सिनेमाने १६ कोटी रुपये कमाई केली तर दिल्लीत ९.५० रुपयांचा गल्ला कमवला. मुंबई, मैसूर आणि प. बंगालमध्ये सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवार, रविवार पुन्हा सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई वाढेल असा अंदाज आहे.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य भूमिकेतअसून, त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या भूमिका आहेत. भारताच्या मंगळ मोहिमेच्या कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे.