अकोला,
भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकून झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 11 च्या सुमारास सुकळी फाट्याजवळ घडली. रोहणखेड येथील चेतन दिनकरराव झामरे या अपघातात ठार झाला.
रोहणखेड येथील चेतन झामरे हे पत्नी व दोन नातलगांसह कारने दर्यापूरकडे जात होते. दरम्यान, सुकळी फाट्यासमोर कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकली. झाडावरधडकल्यानंतर कार तीन ते चार वेळा पलटली. यामध्ये चालक चेतन झामरे हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी व इतर दोन नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येवदा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले आहे.