पाकिस्तानचे समर्थक कोण?

    दिनांक :18-Aug-2019
भारताद्वारे जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटविणे आणि या राज्याच्या प्रशासकीय पुनर्गठनामुळे अस्वस्थ पाकिस्तानने पहिल्या आठवड्यातच जगातील सर्व दरवाजे खटखटविले.
 
पहिली तक्रार अमेरिकेकडे केली. कारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान एवढ्यातच भेट घेऊन आणि काश्मीरप्रश्नी मध्यस्थतेचे पिलू सोडून परत आले होते. अमेरिकी परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ता मॉर्गन ऑर्टागस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काश्मीर मुद्यावर त्यांच्या देशाच्या धोरणात कुठलेच परिवर्तन झालेले नाही.

 
 
यानंतर पाकिस्तान धावला चीनकडे. परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरेशी बीिंजगला पोहचले आणि विशेषत: लडाख व ‘वन बेल्ट, वन रोड’वरून चिंतीत चीनला आणखी भडकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचा चीन दौरा अधिक प्रभावी ठरला आणि त्यांनी आशियातील प्रमुख शक्तींना एकमेकांविरुद्ध भिडविण्याच्या पाकिस्तानी प्रयत्नांवर, चीनमधील आपल्या राजदूत असण्याच्या दीर्घकालीन अनुभवाच्या आधारावर, पाणी फेरले. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवंानाही पत्र लिहून हा मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न केला. भारताने जम्मू-काश्मीरप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1949च्या प्रस्तावाचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला. याला जे उत्तर मिळाले ते पाकिस्तानची घोर निराशा करणारे होते. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांनी 1972 च्या युद्धात भारताकडून पाकिस्तानच्या सडकून पराभवाचे स्मरण करून देत ‘सिमला करारा’ची पाकिस्तानला आठवण करून दिली.
 
या महत्त्वाच्या क्षणी, आपल्या जुन्या मित्राच्या पाठीशी उभे राहून रशियानेही आपली दिशा स्पष्ट करीत म्हटले की, भारताने हा निर्णय संवैधानिक चौकटीत घेतला आहे.
 
हे सर्व झाले; परंतु या सर्वांहून अधिक हृदय विदीर्ण करणारी गोष्ट पाकिस्तानसाठी झाली ती सौदी अरब व इस्लामी सहयोग संघटनेकडून (आयओसी). या दोघांकडूनही पाकिस्तानला काहीच सहकार्य मिळाले नाही.
 
पाकिस्तानचे समर्थक पाकिस्तानशिवाय दुसरे कोण आहेत?
जगाच्या राजकीय सारीपाटावर, भू-राजकीय महत्त्वाचा हा अतिशय महत्त्वाचा घटनाक्रम भारत विरुद्ध पाकिस्तान असा बघितला जात होता. येथे पाकिस्तानची तक्रार हवेत उडून जाणे आणि भारताच्या बाजूने जागतिक-मताची लाट बघून, ज्या लोकांना मागील कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाची केवळ सैर करत आहेत, असे वाटत होते, त्यांची फक्त कीवच करावी लागेल.
 
2013 नंतर आजपर्यंतच्या कार्यकाळात भाजपाप्रणित रालोआचे सरकार, महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट धोरण अवलंबित सशक्त, समरस, समान भारताची रूपरेषा देश आणि जगासमोर ठेवण्यात निश्चितच यशस्वी ठरले आहे.
 
भारतामध्ये सर्व समाजाच्या कल्याणाचा विश्वास आणि जागतिक मंचावर दहशतवादाला कुठल्याही प्रकारे सहन न करणारी एकजूटता आकार घेत आहे. परंतु, भारत आणि जगाला जी गोष्ट चांगली वाटते त्याने पाकिस्तान अस्वस्थ कसा होणार नाही? दहशतवादावर प्रहार झाला अन्‌ पाकिस्तान चुळबुळला नाही, हे कसे होऊ शकते? म्हणून आता त्याचा नवा पवित्रा आहे, अफगाणिस्तानात फसलेल्या अमेरिकेचा हात काश्मीरच्या मुद्यावर पिरगाळणे. पाकिस्तानने अमेरिकेला संकेत दिले आहेत की, बदललेल्या परिस्थितीत त्याला अफगाणिस्तानच्या सीमेवरून हटवून आपले सैनिक काश्मीरच्या सीमेवर पाठवावे लागू शकतात. तशीही त्याची ही चाल फसणे निश्चित आहे.
 
याची दोन कारणे आहेत. पहिले हे की, अफगाणिस्तानच्या प्रश्नाला काश्मीरशी जोडण्यावरून तालिबानने पाकिस्तानच्या मुत्सद्यांना चांगलेच फटकारले आहे. दुसरे हे की, विद्यमान अमेरिकी राष्ट्रपती त्यांच्यावर कुरघोडी करणार्‍या कुणालाही िंकवा भयादोहन करण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना त्वेषाने चिरडणारे म्हणून ओळखले जातात.
 
अशात, जगभरात हारलेल्या पाकिस्तानसाठी काय उरते? फक्त भारतातील त्याचे समदु:खी!
राजकारण ते मीडियापर्यंत, सेक्युलर-बुद्धिजीवी टोळीपर्यंत, असे संदिग्ध चेहरे चमकताना तुम्हाला सापडतील. पाकिस्तानी प्रवक्त्यांची वाक्ये भारतात उच्चारणारे, इस्लामी िंहसेवर मौन; परंतु सीमेवर ‘अमन की आशे’च्या मेणबत्त्या पेटविणारे, एवढेच नाही तर, (माजी पाकिस्तानी आयुक्त अब्दुल बासित यांनी स्वत:च खुलासा केल्याप्रमाणे) बुरहान वाणीसारख्या दहशतवाद्याच्या खातम्यानंतर दहशतवादाच्या मुद्यावर देशाला भ्रमित करणारे!
 
खरेतर, पाकिस्तानला आधार इतर जगाकडून नाही; भारतात शिल्लक घराणेशाही राजकारणाच्या अंकुरांकडून आहे. भारतात पाकिस्तानी तुकड्यांवर पोसलेल्या त्या लाळ गाळणार्‍या कथित आंदोलनकारी टोळ्यांकडून आहे, जे ‘भारत तेरे टुकडे होंगे’चे नारे लावतात.
जगाने पाकिस्तानची खेळी जाणली आहे. सेक्युलॅरिझम, प्रगतिशीलता आणि आंदोलनकारिता यांची खोळ पांघरून शेजार्‍याचे हित बघणार्‍यांचा खेळ आम्ही भारतीयांनी नीट समजून घेतला तरच सर्व काही साधणार आहे!
 
(पाञ्चजन्यवरून साभार)
••