मिशन मंगल'ची तिसऱ्या दिवशी इतक्या कोटींची कमाई

    दिनांक :18-Aug-2019
मुंबई,
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी धमाकेदार कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली आहे. तिसऱ्या दिवशी सिनेमाने ६९ कोटींची मोठी कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी या सिनेमाने २८ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ४५ कोटींची कमाई केली. त्यानंतर या सिनेमाने तिसऱ्या दिवसाला एकूण ६९ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने रविवारी ३०-३५ टक्क्यांची कमाई केल्यास, ४ दिवसाच्या आत 'मगंल मिशन' सिनेमाचा १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश होऊ शकतो.
जगन शक्ती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य भूमिकेतअसून, त्याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू आणि सोनाक्षी सिन्हा आहेत. भारताच्या मंगळ मोहिमेची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.