उंबर्डा बाजार - जांब रस्त्याची दयनीय अवस्था

    दिनांक :19-Aug-2019
नादुरुस्त पुलामूळे अपघाताची शक्यता
 
उंबर्डा बाजार,
उंबर्डा बाजार वहितखेड जांब मार्गावरील ठाकुर गुरूजी यांचे शेताजवळील हनुमान मंदिरा लगत असलेल्या पुलाची दयनीय अवस्था झाली झाली असून नादुरूस्त पुलावरून वाहन चालवितांना तारेवरची कसरत करीतच वाहन चालवावे लागत असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे या पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
 

 
उंबर्डा बाजार वहितखेड जांब या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरून पायदळ चालणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवितांना अनेक दुचाकी वाहनांना अपघात होवून वाहन चालकांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे ठाकुर गुरूजी यांचे शेताजवळील हनुमान मंदिरा लगत असलेल्या पुलावर मोठा खड्डा पडला असून पावसाळ्याच्या दिवसात पुलावर पाणी जमा होत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी उंबर्डाबाजार जांब वहितखेड रस्त्याची त्वरीत डागडुजी करून पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.