हिनाने विदेशात फडकावला भारताचा झेंडा

    दिनांक :19-Aug-2019
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून प्रेक्षकांसमोर आलेली हिना खान तिच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहत असते. ‘ये रिश्ता..’ या मालिकेमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी हिना ख-या आयुष्यात पूर्णपणे वेगळी आहे. अनेक वेळा फटकळपणामुळे आणि बोल्ड फोटोमुळे चर्चेत येणारी हिना पुन्हा एकदा एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. न्युयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या हिनाने तेथे भारताचा झेंडा फडकावल्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा होत आहे.
 
 
 
हिना सध्या प्रियकर रॉकीसोबत न्युयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळी तिला पहिल्यांदाच ‘इंडियन डे परेड’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या परेडमध्ये सहभागी झाल्यामुळे हिना प्रचंड आनंदी असून तिने सोशल मीडियावर याचे काही फोटो शेअर केले आहेत.हिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती भारताचा झेंडा फडकावत आहे.
“भारतीय असल्याचा मला गर्व आहे. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करताना मला विशेष आनंद होत आहे. खासकरुन तेव्हा, ज्यावेळी जगातील सर्वात सामर्थ्यशाली देशामध्ये आपल्या देशाचा झेंडा गौरवाने फडकविण्याची संधी मिळते”, असं कॅप्शन देत हिनाने हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, हिनापूर्वी बॉलिवूडमधील अर्जुन कपूर, कमल हसन, सैफ अली खान, श्रृती हसन, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा आणि अनुपम खेर हे कलाकार इंडियन डे परेडमध्ये सहभागी झाले होते.