'केबीसी'मध्ये अमिताभची स्टायलिस्ट एन्ट्री

    दिनांक :19-Aug-2019
मुंबई:
'कौन बनेगा करोडपती' च्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज रात्री ९ वाजता एका स्टायलिस्ट अंदाजात या शोचे होस्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांची एन्ट्री होणार आहे. सोनी टीव्हीने आपल्या ट्विटर हँडलवर याचा प्रोमो जारी केला आहे.

या प्रोमोमध्ये अमिताभ म्हणतात, 'सोनीने सर्वकाही नवं बनवलं आहे. सेटच इतका स्टायलिस्ट असेल तर माझी एन्ट्री पण तशीच स्टाईलमध्ये हवी.
 
 
 
 
' यानंतर ते स्टेजवर आपल्या खास दिमाखात एन्ट्री घेतात. सोनीने बदललेला हा शोचा लुक पाहून आणखी काही बदल या शोमध्ये केलेत हा ते पाहणे उत्सुकतेचे आहे.