प्रभासचं ६० फुटी कटआऊट

    दिनांक :19-Aug-2019
मुंबई:
'बाहुबली'फेम अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा 'साहो'ची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. रविवारी १८ ऑगस्टला हैदराबादेत या सिनेमाचं प्रि रिलीज फंक्शन होतं. यात सिनेमाच्या टीमसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचं खास आकर्षण होतं ते म्हणजे प्रभासचं ६० फुटी कट आऊट!

हैदराबादेतील रामोजी फिल्म सिटीत हा कार्यक्रम झाला. येथे प्रभासचं हे कट आऊट उभारण्यात आलं होतं. या सिनेमात प्रभासव्यतिरिक्त श्रद्धा कपूर, नीत नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आदि कलाकार आहेत. येत्या ३० ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.