'मिशन मंगल'चे मिशन फसले

    दिनांक :19-Aug-2019
मुंबई,
अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवत असला तरी, विकेंडला बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवण्याचे 'मिशन' पूर्ण होऊ शकलं नाही. या चित्रपटानं रविवारी जवळपास २७.५० कोटींची कमाई केली. हा चित्रपट यावर्षी रविवारी सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.
 
 
 
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. रविवारी या चित्रपटानं २७.५० कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत या चित्रपटानं ९६.५० कोटींचा एकूण गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २८.५० कोटींची कमाई करणाऱ्या 'मिशन मंगल'ला मुंबई, दिल्ली, एनसीआर आणि दक्षिणेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अक्षयच्या चित्रपटांनी विकेंडला केलेल्या कमाईत '2.0' हा सर्वात पुढे आहे.
'मिशन मंगल'ची चार दिवसांची कमाई
गुरूवार: २८.५० कोटी (अंदाजे)
शुक्रवार: १७ कोटी
शनिवार : २३. ५० कोटी
रविवार : २७. ५० कोटी