सिरोंचा पुलाजवळ बस व ट्रकचा अपघात

    दिनांक :19-Aug-2019
कोणतीही जीवितहानी नाही.
अहेरी,
सिरोंचावरून चामोर्शीकडे तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकची आलापल्ली येथील सिरोंचा पुलावरील चौरस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसला धडक दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 
ही घटना आज सकाळच्या सुमारास 6:15 वाजता घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस व ट्रकचे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, सिरोंचा वरून चामोर्शीला तांदूळ घेऊन जाणारा जे.आर.सी रोडलाईन्सचा ट्रक क्रं. सी जी 08एल 1262 व एसटी महामंडळची अहेरी-एटापल्ली-गडचिरोली बस क्रमांक.एम .एच.40 ए क्यू 6094 ला मागच्या बाजूने हलकी धडक दिली. या धडकेत बस व ट्रकचे नुकसान झाले आहे.बसमध्ये चार प्रवासी होते सर्व सुखरूप आहेत. घटनेची माहिती  मिळताच एस .टी महामंडळ चे अधिकारी व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.