काळी फ़ित लाउन विजुक्टा ने प्रगट केला शासनाविरोधात रोष

    दिनांक :19-Aug-2019
समुद्रपुर,
शासनाने कनिष्ट महाविद्यालयीन प्राध्यापकांचे विविध मागण्या संदर्भात दिलेल्या लेखी आस्वासनांची पूर्तता न केल्याने तसेच प्रलंबित मागण्याची पूर्तता न केल्याने काळी फ़ित लाउंन विजक्टचे वतीने दिनांक १९ ऑगस्ट पासून रोष आन्दोलनाला सुरवात केली आहे. विद्या विकास कनिष्ट महाविद्यालय व विकास कनिष्ट महाविद्यालय समुद्रपुर येथील सर्व प्राध्यपकानी या आंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला व प्राचार्याना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक २० फेब्रूवारी २०१९ च्या बैठकीत शासनाने दिलेली आस्वासने तसेच २६ फेब्रूवारी २०१९ च्या बैठकीत वित्तमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत सोबतच्या बैठकीत विविध प्रलंबित मागन्यासन्दर्भत लेखी आस्वासने देऊन सुद्धा त्यांची पूर्तता करण्यात आली नाही.
 
 
अनुदानाचे संदर्भात महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा समिती व उच्य माध्यमिक शाळा कृती समिती यांचे आन्दोलनाला विजुक्टा ने जाहिर पाठीबा दिला आहे.विना वेतन वीना पेंशन पुरोगामी महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात वेठबिगारी सुरु आहे. शिक्षण विरोधी शासनाच्या या धोरनाविरुद्ध गेल्या दोन महिन्या पासून विजुक्टाच्या वतीने विविध पातळीवर निवेदन दिले जात आहे. परंतु शासन मात्र पूर्णपने उदासीन आहे. याबाबत रोष प्रगट करण्यासाठी काळी फ़ित लावून आंदोलन करण्यात आले.  यात विजुक्टा चे समुद्रपुर तालुकाध्यक्ष किरण वैद्य , सचिव गुलाब थुटे , भास्कर थुटे ,मंगला खुने ,फरिश् अली, विलास बैलमारे ,रमन मोहितकर ,नरेंद्र मेश्राम, चंद्रकांत सातपुते, महेश चिवाने , जितेंद्र तोमर ,राजू बाबुळकर, वाल्मीक वाघमारे,अरविंद दडमल, तेजस्विनी डोपे,आरती शेलोटे पुसनाके, वाघे आदि सर्व प्राध्यापक सहभागि आहेत.