वनकर्मचार्यांनी दिले कासवांना जीवनदान

    दिनांक :02-Aug-2019
गोंदिया, 
वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया सुशील नांदवटे यांना गुप्त हेराकडून संदेश प्राप्त झाला की गोंदिया वनपरिक्षेत्र मध्ये पाच ते सहा कासव एका पाण्याच्या टाकीत ठेवले आहेत, त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सहाय्यक वनसंरक्षक तेंदू व कॅम्पा शेंडे यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन घेऊन तात्काळ आपल्या वन कर्मचारी आणि फिरते पथक गोंदिया क्रमांक एक सोबत वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मस्कर यांच्यासह नियोजित स्थळी पोहोचले. परिसरात शोध घेऊन पाच कासवांना वाचविण्यात आले. पंचनामा करून कासवांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.