उद्यापासून शेगांव येथे सहकारी बँकांचे महाअधिवेशन

    दिनांक :02-Aug-2019
 शेगाव,
५ ऑगट २०११ रोजी शेगांव येथील हॉटेल पंचवटी इन येथे करण्यात आले आहे. या महाधिवेशनात महाराष्ट्रातील ३०० नागरी सहकारी बँकांना आमंत्रित करण्यात आले असून या बँकांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच आयटी अधिकारी यांसह सुमारे १५०० हुन अधिक प्रतिनिधी या महाअधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व महाअधिवेशनाचे प्रभारी विवेक जुगादे व अधिवेशन संयोजक आशिष चौबिसा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महाअधिवेशनाचे उद्घाटन ४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता होणार असून समारोप ५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.
 
या महाअधिवेशनास  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अनिल बोंडे,  कामगार व मागासवर्गीय कल्याणमंत्री  डॉ. संजय कुटे, केंद्र व राज्य शासनाने अन्य मंत्री, राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी, भारतीय रिजर्ह बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय अर्थमंत्रालयातील उच्चस्तरीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच सहकार भारतीचे माजी संरक्षक व भारतीय रिजर्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व सहकार भारतीचे विद्यमान संरक्षक व नॅफकबचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता हे या अधिवेशनास दोन्ही दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच नागरी सहकारी बँकांपुढे अनेक प्रश्न उभे ठाकलेले आहेत. यामध्ये बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कर्मचारी भरतीचे
अधिकार बँकांकडून काढून घेणे, शासकीय योजना सहकारी बँकांच्या माध्यमातून राबविण्यास उदासीनता दाखविणे यांसारख्या अनेक प्रश्नांमुळे आज सहकारी बँकांची चळवळ संक्रमण अवस्थेतून जात आहे. यासोबतच सहकारी बँकांचे खाजगीकरण, बँकींग रेग्यूलेशन ॲक्टमध्ये सुधारणा भारतीय रिजर्व्ह बँकेने सर्व सहकारी बँकांना रोड मॅप देणे तसेच सायबर सेक्यूरिटी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी शासनाने आर्थिक अनुदान द्यावे यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी नामांकित तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या महाअधिवेशनास लाभणार असून भारतीय रिजर्व्ह बँक व शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत व त्यासाठी महाअधिवेशनात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या सर्व प्रश्नांवर उपाय मिळविण्यासाठी आपण सर्व बँकांनी आपले राजकीय विचार, प्रतिष्ठा बाजूला ठेवून संघटीत होवून लढा देण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यासाठी अखिल भारतीय स्तरावर १९७८ पासून कार्यरत असणा-या सहकार भारतीच्या माध्यमातून बँकांच्या समस्या सोडविण्यासाठी या महाअधिवेशनाच्या निमीत्याने व्यासपीठ निर्माण होत आहे. सदरचे महाअधिवेशन हे अतिशय उपयुक्त असून या महाअधिवेशनाची विषयानुरूप कार्यक्रम पत्रिका तयार करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे संघटन मंत्री निळकंठ देवांगणव अधिवेशन महाव्यवस्थापक दिनेशगायकी उपस्थित होते.