संजय दत्तच्या 'बाबा'ची गोल्डन ग्लोबमध्ये निवड

    दिनांक :02-Aug-2019
भिनेता संजय दत्तची पहिली मराठी निर्मिती असलेला 'बाबा' या चित्रपटाची गोल्डन ग्लोब २०२०साठी अधिकृतरित्या निवड झाली आहे. २०२०मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात विदेशी भाषा विभागात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. भारतात शुक्रवारी हा सिनेमा प्रदर्शित झाला.
 
 
 
''बाबा' चित्रपट ग्लोल्डन ग्लोबमध्ये प्रदर्शित होतोय याचा आम्हाला खुप आनंद आहे. 'आम्हाला मनोरंजनाबरोबरचं अर्थपूर्ण सिनेमा बनवायचा होता. बाबाच्या माध्यमातून आमचं हे स्वप्न पूर्ण झालं. आज चित्रपट प्रदर्शित होतोय आणि आम्हाला आशा आहे प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल,' असं चित्रपटाच्या निर्मात्या मान्यता दत्त यांनी सांगितलं.
मूक बधिर जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाची शंकरची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे. अचानक शहरातील एक दाम्पत्य शंकरवर त्यांचा हक्क सांगते. तिथूनच पुढं शंकरच्या आई-वडिलांचा लढा सुरू होतो. आपल्या मुलाला मिळवण्यासाठी बाबानं केलेला संघर्ष चित्रपटात दाखवण्यात आला आहे.