ट्रक कॅनल मध्ये पडुन क्लिनरचा मृत्यू

    दिनांक :20-Aug-2019

गिरड/समुद्रपुर,
नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन येणार ट्रक कालव्यात पडल्याने झालेल्या अपघातात ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाला आहे. अपघातात ट्रकचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. मुत्यक क्लिनरचे नाव एहसान खान अयुब खान असून तो हरयाणातील पलवल मेवाद येथील रहिवासी आहे. तर, जखमी चालकाचे नाव नशिब खान अब्बास खान असून तोही मटेपुल पलवल, हरयाणा येथे राहणार आहे.

 
ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने‌‌ ट्रक आजदा शिवारात अनियंत्रित होऊन कॅनलच्या पुलावर जाऊन धडक देत कॅनल मध्ये पडला. या भिषण अपघातात क्लिनरच्या अंगावर ट्रक मधिल पाईप पडुन तो जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
 

 
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (२० ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास नागपूर वरून सेंटिंगचे पाईप घेऊन जाम कडे येत असलेल्या ट्रक चालक नशिब खान अब्बास खान यास झोपेची डुलकी आल्याने ट्रकने कॅनलच्या पुलाला धडक देत पलटी होऊन २० फुट खोल कॅनल मध्ये पडला. या वेळी ट्रकमध्ये असलेल्या पाईपांमध्ये दबुन क्लिनर एहसान खान अयुब खान जागीच ठार झाला. घटनेची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच प्रभारी साहाय्यक पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी चालकास उपचारासाठी हलवले व क्लिनरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपुर ग्रामिण रुग्णालयात पाठवला असून समुद्रपुर पोलीस पुढील तपास करीत आहे.