शिक्षण विभागात आंदोलक शिक्षकांनी केली तोडफोड

    दिनांक :20-Aug-2019

- जिप प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन 

 
गोंदिया, 
विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळेत शिक्षक नसल्याने आम्ही काय करावे, अशी विचारणा करण्याकरिता आलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षणाधिकाèयांनी आज शाळेतच प्रवेश घेऊ नका असे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलकांंनी शिक्षणाधिकाèयांचे कक्ष गाठत कक्षातील टेबल खुच्र्याची तोडफोड करुन जिप प्रवेशव्दारासमोर ठिय्या दिला. दरम्यान, परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे.
 
गत ९ ऑगस्टपासून आपल्या वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करणाèया महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली गेली नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत, कसे करायचे हे विचारायला आलेल्या विद्याथ्र्यांनाच शिक्षणाधिकारी यांनी विनाअनुदानित शाळेत विद्याथ्र्यांना प्रवेश घेऊ नये असे म्हटल्याने त्या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकारी यांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय गाठले व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या वादात कार्यालयातील खुच्र्या टेबलांची तोडफोड केली. या घटनेने चांगलेच वातावरण तापले. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने ग्रामीण पोलिसांनी प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेत सर्व आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेतले. आंदोलक शिक्षकांनी उग्ररुप धारण केल्याने जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.