आता जा काश्मीरला...

    दिनांक :20-Aug-2019
भारत देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी प्रत्यक्षरूपी स्वर्ग काश्मीर! म्हणूनच त्या स्वर्गात एकदा तरी जावं, अशी सगळ्यांनचीच इच्छा असते. पूर्वी पर्यटक खूप जायचे आणि आधी हिंदी फिल्मची तर तिथेच शूटिंग व्हायची. परंतु, गेल्या दोन दशकांपासून पर्यटकसंख्येमध्ये खूप मोठी घट झाली आहे. 

 
 
पर्यटन हा नेहमी लोकांचा आवडीचा विषय असतो. शांत, सुंदर, निसर्ग आणि सुरक्षित जागेवर लोक फिरायला जातात.
काश्मीर हे नेहमी पारिवारिक पर्यटकस्थान रहिले आहे आणि नेहमी राहील. आपण स्वित्झर्लंड, कॅनडाला जाऊ शकत नसाल तर काश्मीरला जा, तुम्हाला सारखेच वाटेल.
 
मोदीजींनी सांगितले की, कश्मीरमध्ये पर्यटनाला खूप वाव आहे. स्पिरिच्युअल टूरिजम, ॲडव्हेंचर टूरिजम, रिलिजस टूरिजम आणि हो, मग वैष्णव देवीचे दर्शन असो की लेह-लद्दाखची बाईक राईड, अमरनाथची यात्रा अथवा कश्मीरची व्हॅली, टूरिजममुळेच कश्मीर आपल्या सगळ्यांसोबत कनेक्ट राहून आहे आणि टूरिजममुळेच कश्मीरमध्ये जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती होईल. सरकारच्या या नवीन निर्णयामुळे आणि कलम 370 काढून घेतल्यानंतर काश्मिरी आणि काश्मीर दोघांची खूप खूप प्रगती होणार आहे.
 
मी पर्यटन व्यवसायात गेल्या काही वर्षांपासून आहे. हे जे नवीन धोरण आहे ही मुळात स्थानिक नागरिकांचीच इच्छा होती. काश्मिरात फिरताना अनेकदा तिथल्या लोकांशी गप्पा मारताना तीच मंडळी हे बोलून दाखवायची.
 
विचित्र नियमामुळे तिथे पर्यटनाच्या व्यतिरिक्त काहीच नव्हते. त्यामुळे स्थानिक लोक टूरिजममुळेच पैसे कमवायचे. अनेक टूरिस्ट येतील, याकडे डोळे लावून बसायचे.
 
मूळ काश्मिरी तरुण कधीच या वादात पडला नाही आणि हे सगळे ठीक व्हावे, ही संपूर्ण कश्मीरची इच्छा होती. जी आता सरकारने पूर्ण केली. कश्मीर परत शांत, सुंदर, निसर्ग आणि सुरक्षित लवकरच होईल. काश्मीर आपल्या स्वागतासाठी तयार होत आहे.
 
आता मनात भीती न ठेवता आपल्या परिवारासोबत काश्मीरला बिनधास्त फिरायला जा!
 
कितनी खूबसूरत ये तस्वीर हैं
मौसम बेमिसाल बेनज़ीर हैं
ये कश्मीर हैं, ये कश्मीर हैे...