हिंदू धर्माचा अपमान केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक

    दिनांक :21-Aug-2019
अंजी,
सोशल मिडीया वर हिंदू धर्माबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट टाकल्याप्रकरणी डाॅ कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हींदू धर्माच्या लोकांनी तसेच गावाती सरपंच जगदीश संचरीया, भाजपा महामंत्री सुनिल गफाट, माजी सरपंच दीपक बावणकर, राम नवमी उत्सव समितीचे मनोज गुप्ता तसेच समितीचे कार्यकर्ते वगावातील नागरीकांनी या विषयी खरांगणा पोलीस स्टेशनचे ठानेदार संजय गायकवाड यांना निवेदन दिले. जो पर्यंत डॉ. कांबळे यांना अटक होत नाही तो पर्यंत आंदोलन सूरू राहील असे या निवेदनात म्हंटले आहे. ठाणेदारांनी याची दाखल घेऊन आरोपीला अटक केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आरोपीला अटक करून पुढील तपास खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड व यांची चमू करीत आहे या घटनेची पाहणी पोलीस उपविभागीय अधीकारी पुलगांव तृप्ती जाधव यांनी केली आहे.