धाम नदीत बुडून एकाचा मृत्यू

    दिनांक :21-Aug-2019
 वर्धा : नागपुर मार्गावर असलेल्या पवनार आश्रम येथील धाम नदी परिसरात फिरायला आलेल्या चार जनांपैकी एकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. राहुल खोडके (वय ३३) रा. बोरगाव मेघे वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे.
आशिष भाजीपाले (वय २०) दीपाली तिसरडे (वय ३४) प्रणाली भिसे (वय १७) हे तिघे राहुल सोबत पवनारला आले होते. हे चौघेही वर्धा येथील फॅन्सी शुज दुर्गा टॉकीज जवळ असलेल्या दुकानामध्ये काम करीत होते.
 
 
राहुल हा त्याचे मित्र पवनार येथील धाम नदीवर फिरायला आले होते. दरम्यान राहुल हा नदीपात्राच्या काठावर उभा होता तर अन्य मित्र त्याचे फोटो काढत होते. मात्र या नादात राहुलचा पाय घसरला आणि तो गांधी-विनोबा यांच्या समाधीस्थळा जवळ असलेल्या गायमुख या डोहात पडला. या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे तो खडकात पोकळी असलेल्या जागी जावून अडकला. त्याला वाचवायला आशिष भाजीपाले याने पाण्यात उडी घेत राहुलला वाचविण्याचे बरेच प्रयत्न केले. पण तो ही बुडायला लागला मात्र त्याला वाचविण्यात यश आले. आशिष भाजीपाले याला भारत पटेल या 16 वर्षाच्या तरुणाने बुडताना वाचविले. या प्रकरणी सेवाग्राम पोलिस पुढील तपास करीत आहे.