आरोग्यासाठी वरदान खजूर

    दिनांक :23-Aug-2019
खजुराची आठवण उपवासावेळी येते. खजूर त्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्या ऋतूंमध्ये खाण्यास योग्य आहे. प्रामुख्याने आखाती देशात खजुराचं उत्पादन केलं जातं. खजुरामध्ये आयर्न आणि फ्लोरिनचं प्रमाण जास्त असतं. रोजच्या आहारात खजुराचा समावेश केल्यास सर्व रोगांपासून बचाव शक्य आहे.
 
 
 
 
 
* खजुराच्या सेवनामुळे कोलेस्टरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे डाएिंटग करत असताना अशक्तपणा जाणवू नये यासाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.
 
* खजुरामध्ये मिनरल आणि व्हिटॅमीनबरोबरच प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते.
 
* खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचनसंस्थेच्या तक्रारी असणार्‍यांसाठी खजूर फायदेशीर ठरतो.
 
* खजुरामध्ये व्हिटॅमीन बी 1, बी 2, बी 5, आणि व्हिटॅमीन सीचा समृध्द स्त्रोत आहे.
 
* खजुरामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे.
 
* अॅनिमिया असलेल्या रुग्णांना खजुराचं सेवन वरदान ठरू शकतं.
 
* वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवायचं असेल तर खजुराचं सेवन फायदेशीर ठरतं.
 
* खजुराच्या सेवनामध्ये सातत्य असेल तर अकाली वृध्दत्वाच्या समस्या भेडसावत नाहीत.
 
* फक्त खजूर खाण्यानेच नव्हे तर खजुराच्या तेलाचेही फायदे आहेत. खजुराच्या तेलाने मालिश केल्यास त्वचारोग बरे होण्यास मदत होते.