फळ गुणधर्म

    दिनांक :23-Aug-2019
दिवसभराच्या आहारात 300-400 ग्रॅम फळं जाणे आवयक आहेच. रोज 1-2 प्रकारचे तरी फळं घेतले पाहिजेत. भारतात खूप विविध प्रकारची फळे होतात. त्यामध्येदेखील जी फळे आपल्या भागात होतात आणि सीझनल आहेत ती घ्यायला हवी. फळं खालील प्रकारात विभागल्या जातात. जसे- िंलबूवर्गीय फळं, गर असलेले, रसाळ फळं, बेरीज इत्यादी.

िंलबूवर्गीय फळांमध्ये िंलबू, मोसंबी, संत्र, ईडिंलबू इत्यादी येतात. यांमध्ये भरपूर जीवनसत्त्व क असते. जीवनसत्त्व क अँटिऑक्सिडंटस्‌चे काम करतात. त्याने रोगप्रतिकारकाक्ती वाढते. दिवसभरात एकतरी आंबट फळ सकाळच्या नाश्त्यानंतर िंकवा जेवणानंतर घ्यावे, ज्याने अन्नातले पौष्टिक घटक शोषल्या जातात. आवळादेखील जीवनसत्त्व क ने परिपूर्ण असतो. त्यामुळे ज्या वेळी आवळे मिळतात तेव्हा ते आवर्जून खावेत. आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ, जसे- आवळा सरबत, मोरावळा, आवळा सुपारी, लोणचं असे बनवून ठेवले व वर्षभर खाल्ले तरी आवळ्याचे गुणधर्म पुरेपूर मिळतात.
गर असलेल्या फळांमध्ये आंबा हा सगळ्या फळांचा राजा! आंब्यामध्ये खूप गुणधर्म असतात. कर्बोदके, जीवनसत्त्व, खनिजे यांनी आंबा परिपूर्ण असतो. लहान मुलांसाठी, आजारी व्यक्तींसाठी, वजन वाढवण्यासाठी आंबा, केळी, चिकू अतिशय चांगली फळे आहेत. पपईदेखील जीवनसत्त्व अ ने परिपूर्ण आहे तसेच बद्धकोष्ठतादेखील त्याने दूर होते. सफरचंदाच्या बर्‍याच जाती आहेत. त्यामध्ये आपल्याकडचे काश्मीरचे सफरचंद, तेदेखील हिवाळ्यात मिळणारे सगळ्यात उत्तम असतात. पीयर, आलूबुखार हेदेखील जीवनसत्त्व आणि खनिजांनी पुरेपूर असतात. इतर रसाळ फळांमध्ये टरबूज, डािंळब, खरबूज, लिची अशी असतात. ही फळे उन्हाळ्यात भरपूर निघतात. उन्हामुळे होणारा डिहायड्रेशनचा त्रास या फळांनी कमी होतो.
बेरीज खूप प्रकारच्या असतात. ब्ल्यू बेरीज, स्ट्रॉबेरीज, मलबेरी, द्राक्ष, रासबेरी, आवळा मलबेरी भारतात होतात. बेरीज साधारणत: हिवाळ्यात येतात. तेव्हा त्या भरपूर खाव्यात. बेरीजमध्ये क जीवनसत्त्व आणि रेषा तंतुमय पदार्थ भरपूर असतात. अँटिऑक्सिडंटस्‌ असल्यामुळे कॅन्सर रोखण्यासाठी, हृदय, रक्तदाब, वजन कमी करण्यासाठी बेरीजचा खूप चांगला उपयोग होतो.
दररोज ऋृतुमानाप्रमाणे 1-2 फळे वेगवेगळी जरूर घ्यावी. भाजी आणि फळांमधूनच आपल्याला जीवनसत्त्व अ, क, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, पेक्टीन, िंझक, फॉस्फोरस, लोह असे अनेक पोषक घटक मिळतात. रोजच्या आहारात त्यांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सुदृढ होते.
•डॉ. प्राची तारसेकर
9527566018