अकोलाजवळ दोन कंटेनरमधील भीषण अपघातात २ ठार

    दिनांक :24-Aug-2019
बाळापूर,
राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील शेगाव टी पॉईंट जवळ दोन कंटेनरमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनाचे चालक जागेवरच ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. 

 
 
आज सकाळी 4.30 वाजे दरम्यान कुरियर घेऊन खामगावकडे जाणारा कंटेनर क्र एच आर 55 यू 1334 व लोखंडी कॉइल्स घेऊन अकोलाकडे जाणारा कंटेनर क्र एमएच 48 बि एम 2543 मध्ये अमोरा समोर भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरचा भाग अक्षरशा चकनाचूर झाला व दोन्ही वाहन चालक जागेवरच ठार झाले, बाळापूर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना घटनेची माहिती मिळताच ते अन्य कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
 
पोलिसांनी केबिन कापून मृत ड्राइवरचे शव बाहेर काढले, दुसऱ्या कंटेनर मध्ये असलेले 35 टन चे लोखंडाची क्वाईल्स ट्रकच्या मागील कॅबिन फोडून ड्राइवर वर कोसळल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप कसरत करावी लागली, दोन्ही ट्रक रोड वर असल्याने रोड त्वरित मोकळा करणे सुद्धा आवश्यक होते. 3 क्रेन बोलावून दोन्ही ट्रक वेगळे करून जागेवरच मरण पावलेल्या दोन्ही चालकांना कंटेनरच्या केबिन मधून बाहेर काढून 4 तासात मार्ग मोकळा करण्यात आला. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके ह्यांनी भेट दिली.
 
या अपघातात अस्लम खान हबिब खान व रामसिंह छोटेलाल यादव ह्यांचा जागेवरच मृत्यू झाला अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बाळापूर पोलिसांनी व महामार्ग पथकाने रस्ता सुरळीत केली.