हंडी फोडली, झाला ट्रोल

    दिनांक :24-Aug-2019
मुंबई,
अभिनेता शाहरुख खान आपल्या मन्नत या बंगल्यात सारेच सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. यंदा दहीहंडीही त्याच उत्साहात मन्नतवर साजरी करण्यात आली. मात्र, शाहरुखने ज्याप्रकारे हंडी फोडली, त्यावरून तो चांगलाच ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर शाहरुखचा चांगलाच समाचार नेटकऱ्यांनी घेतला आहे.

 
 
मन्नतबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या साक्षीने शाहरुखने दहीहंडी फोडली. मात्र, हंडी फोडण्यासाठी शाहरुखने बॉडीगार्डच्या खांद्याचा आधार घेतला होता. त्यावरच बोट ठेवत शाहरुखला ट्रोलर्सनी लक्ष्य केले आहे. बॉडीगार्डच्या खांद्यावर बसून हंडी फोडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या व्हिडिओखाली शाहरुखला लक्ष्य करणाऱ्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'बॉडीगार्ड कभी जन्माष्टमी नही भुलेगा ये वाली', बिचाऱ्या गार्डला काय काय झेलावं लागतं, 'या सुरक्षारक्षकासाठी दोन मिनिटं मौन पाळा', अशा अनेक कमेंट्स या पोस्टखाली करण्यात आल्या आहेत.