'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये अनुष्का?

    दिनांक :25-Aug-2019
मुंबई,
गेल्या काही दिवसांपासून बिग-बी अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट 'सत्ते पे सत्ता'च्या रीमेकची चर्चा सुरू आहे. फराह खान आणि रोहित शेट्टी यांनी एकदा असे जाहीर केले होत की ते एकत्रित एक मोठा चित्रपट बनवणार आहे तेव्हापासून या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा होत आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेसाठी अनुष्काच्या नावावर विचार करण्यात आला आहे.
 
 
 
निर्माते आणि अनुष्का यांच्यात हा विषय सुरू आहे. तसेच मुख्य भूमिकेसाठी दीपिका पादुकोण आणि कतरीना कैफ तर अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिकेसाठी शाहरूख खान, ऋतिक रोशन,अक्षय कुमार यांच्या नावावर विचार केला जात आहे अद्याप कोणतेही नाव निश्चित केले गेले नाही,परंतु एका मुलाखतीत ऋतिक रोशन म्हणाला होता की, तो अमिताभ यांचा खूप मोठ चाहता आहे आणि त्यांची भूमिका करायला त्याला खूप आवडेल.