"पाक मुर्दाबाद म्हणणे म्हणजे देशभक्ती नाही!"

    दिनांक :25-Aug-2019
मुंबई,
'बिग बॉस ११' ची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. गायक मिका सिंगला पाठिंबा दर्शवत शिल्पाने टीकाकारांना उत्तर दिलंय. पाकिस्तानमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाला जाण्यावरून कुणावर बंदी घालणं चुकीचं आहे, असं शिल्पा म्हणालीय. मिका सिंग पाकिस्तानमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाला जाणार असल्याने आर्टिस्ट असोसिएशनने त्याच्यावर बंदी घातलीय.
 
 
पाकिस्तानमध्ये कार्यक्रम करण्यापासून आपल्याला रोखून दाखवावं, असं आव्हान शिल्पाने आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहे. देशभक्ती दाखवण्यासाठी 'पाकिस्तान मुर्दाबाद' म्हणणं गरजेचं आहे का? असा प्रश्नही शिल्पाने केला आहे. स्वतःला देशभक्त समजणाऱ्यांनी नुसरत फतेह अली खान यांची गाणी ऐकणं बंद करावं. भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामनेही बघू नयेत. तसंच कलाकारांनी पाकिस्तानमध्ये कार्यक्रम घेण्यावरच त्यांना का आक्षेप आहे? असा सवाल शिल्पाने केलाय.
पाकिस्तानमध्ये उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. तरीही मिका सिंगला कार्यक्रम करण्यासाठी बोलावणं म्हणजे सन्मानाची गोष्टी आहे. सरकारने मिका सिंगला व्हिसा दिला आहे. मग फेडरेशनच्या लोकांनी त्याला अडवण्याचा काय संबंध? मुळात फेडरेशनच मोठी समस्या आहे. आर्टिस्ट आणि क्रू मेंबर्सच्या कामाची वेळ अद्याप हे लोकं निश्चित करू शकले नाहीत. कलाकारांकडून बळजबरीने १२-१५ तास काम करवून घेतले जात आहे, असं शिल्पा शिंदे म्हणाली.