अहेरी जिल्हा आणि वेगळ्या विदर्भासाठी व्यापाऱ्यांचे आंदोलन

    दिनांक :26-Aug-2019
अहेरी,
अहेरी, आलापल्ली येथील व्यापारपेठ आज येथील व्यापारीनी स्वयंम स्फूर्तीने सकाळ पासूनच बंद ठेवली होती, एटापल्ली येथील व्यापारपेठ मागील आठ दिवसापासून बंद असून आज येथील व्यापारीनी सुद्धा त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन 37 वर्षांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही जिल्ह्यातील विकास झाला नाही, जिल्हा मागासलेला असलेला असून विकासापासून कोसो दूर आहे, अहेरी जिल्हा निर्मिती लवकर करण्यात यावी तसेच सध्या वीज वितरण विभागाचे अवाजवी तथा सामान्य माणसाला न परवडणाऱ्या वीज बिलाला त्रस्त होऊन आजचा बंद पाळण्यात आला. यावेळी तहसील कार्यालयात अहेरी आलापल्ली येथील व्यापारी कर्मचारी व पदाधिका-यांकडून तहसीलदयांच्या मार्फत मुख्यमंत्राना निवेदन देण्यात आले.