अपर्णा कुटे यांचा झंझावाती दौरा

    दिनांक :27-Aug-2019
बुलढाणा,
कँबीनेट मंत्री तसेच बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री ना डॉ. संजय कुटे यांच्या पत्नी अपर्णा कुटे यांनी जनसंपर्काचा झंझावात सुरू केला आहे. डॉ. संजय कुटे मंत्री झाल्यामुळे त्यांचे संपुर्ण महाराष्ट्र भर दौरे सुरु आहेत त्यामुळे आपल्या मतदार संघाकडे आणी आपल्या मतदारांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांच्या अपर्णा कुटे यांनी जळगाव जामोद मतदार संघाचा दौरा सुरू केला आहे.
आज शेगांव मधील विविध भागातील महिलांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या त्यांचे सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या महिलांनी सुद्धा उत्सपुर्तपणे त्यांच्या सोबत विविध अडीअडचणीवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत शेगांवच्या नगराध्यक्षा शकुंतला बुच, सभापती रजनी पहुरकर, उपनगराध्यक्षा ज्योती कचरे, पवन शर्मा, गजानन जवंजाळ, अशोक चांडक, पांडुरंग बुच, संदिप टाकर्डै हे पदाधीकारी होते काही समस्या या पदाधीका-यांनी तात्काळ निकाली काढल्या काहींची तातडीने सोडवण्याची व्यवस्था केली. यावेळी पंतप्रधान आयुष्यमान योजनेचे कार्ड वितरण सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात अपर्णा कुटेंच्या  हस्ते करण्यात आले तसेच बालाजी फैल येथील महिलामंडळच्या वतीने आयोजीत नवनाथ विजय ग्रंथाच्या कार्यक्रमात त्यांनी भेट दिली. त्यावेळी बालाजी फैल महिलामंडळाने त्यांचे जोरदार स्वागत केले तसेच जगदंबा नगर मधील महिलांशी चर्चा केली आरोग्य कॉलनीतील महिलांशी त्यांनी हितगुज केले. आगामी काळात छोट्यामोठ्या सर्व समस्या मुक्त शेगांव करू असेत्यांनी आश्वासन दिले, तसेच महिमंडळांनी सामाजीक कार्यात एकत्र येऊन आपली शक्ती विधायक कार्यात लावावी असे आवाहन केले.