'बाला'चा टीझर प्रदर्शित

    दिनांक :27-Aug-2019
मुंबई,
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची सध्या बरीच चर्चा आहे. 'अंधाधुन' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यानं पटकावला तर 'बधाई हो'तील कामासाठीही त्याचं कौतुक झालं. आता त्याच्या हटके चित्रपटांच्या यादीत 'बाला' या चित्रपटांची भर पडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. आयुषमाननं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'बाला' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.
 
 
 
 
 
नेहमीच हटके लुकमध्ये दिसणाऱ्या आयुषमानं या चित्रपटातही प्रेक्षकांना त्याच्या लुकनं आकर्षित केलं. टीझरमध्ये आयुषमान दुचाकीवर बसून आनंदात ‘कोई ना कोई चाहिए प्यार करन वाला’हे गाणं गाताना दिसतो. अचानक जोराचा वारा सुटतो आणि त्याच्या डोक्यावरची टोपी उडून जाते. अन् त्याचं टक्कल दिसू लागतं. त्यामुळं तो नाराज होतो आणि ‘रहने दो छोड़ो भी जाने दो यार’हे गाणे गाताना दिसतो. आयुषमानच्या इतर चित्रपटांप्रमाणं या चित्रपटातही सहज साधा विषय वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे.
 
 
 
येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आयुषमानसोबत दिसणार असून ती एका सावळ्या मुलीची व्यक्तीरेखा साकारात आहे. भूमी आणि आयुषमान या दोघांचा एकत्र हा तिसरा चित्रपट आहे. या पूर्वी त्या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.