मानधन कमी मिळाल्याने बिग बॉसला

    दिनांक :27-Aug-2019
वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणार रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. हिंदी बिग बॉसचे पर्व १३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सहभागी होणार होती. परंतु आता या अभिनेत्री बिग बॉस १३ची ऑफर नाकारल्याचे म्हटले जात आहे.
 
 
 
देवोलीनाने ही ऑफर बिग बॉसने कमी मानधान दिल्याने नाकारली असल्याचे म्हटले जात आहे. देवोलीनाने प्रत्येक आठवड्यासाठी ८०००० रुपयांची मागणी केली होती. तिची ही मागणी बिग बॉसने नाकारल्याने देवोलीनाने बिग बॉसच्या घरात येण्यास नकार दिला. बिग बॉस देवोलीनाला प्रत्येक आठवड्याचे ३०००० हजार रुपयाचे मानधन देत होते. शो निर्मात्यांवर नाजार होऊन देवोलीनाने शोमध्ये येणे टाळले आहे.
बिग बॉस १३ मध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसे, चंकी पांडे, सिद्धार्थ शुक्ला, आदित्य नारायण, मिहिका शर्मा, राजपाल यादव आणि ऋचा भद्रा हे स्पर्धक सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार असून शो पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘बिग बॉस १२’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलेही होते. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम हॉरर असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘बिग बॉस १३’च्या यंदाच्या पर्वामध्ये हॉरर ही थीम पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.