संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

    दिनांक :28-Aug-2019
मानोरा,
मानोरा तालुक्यातील संगणक परिचालकांनी आज पंचायत समितीच्या आवारात विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. 19 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामपंचायत कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसुन येत आहे.
 
 
 
संगणक परिचालकांनी गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांना मागण्याच्या पुर्ततेसाठी निवेदन दिले. त्यांची अमंलबजावणी झाली नसल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदनानुसार ग्रा.पं. संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात समावून घेण्यात यावे, राज्याच्या निधीतून किमान मासीक वेतन 15 हजार रुपये देणे, जुलै 2019 पर्यंतचे थकीत मानधन त्वरीत देणे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे. संगणक परिचालकांचे गेल्या चार महिन्यापासून मानधन रखडले आहे. आठ दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू असल्यामुळे त्याचा ग्रा.पं. च्या दैनदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. ग्रामस्थांना विविध दाखल्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आंदोलात राम राठोड, अफसर शहा, शंकर कुर्‍हाडे आदींसह संगणक परिचालकांचा सहभाग होता.