वाशीमच्या विवानचा चेन्नईत 'डॉक्टरेट'ने सन्मान

    दिनांक :28-Aug-2019
वाशीम,
अनसिंग येथील रहिवासी डॉ पराग व डॉ योगीता सरनाईक यांचा मुलगा विवानने आतापर्यंत सहा विश्वविक्रम प्रस्थापित केले आहे. त्याची नोंद विविध रेकॉर्ड बुक मध्ये झालेली आहे. तो जिथेही अवार्ड समारंभात जातो तो त्या समारंभातील सर्वात कमी वयात अवार्ड प्राप्त करणारा अवार्डी असतो. चेन्नई येथे नुकतेच विवानचा डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. 

 
 
वाशीम जिल्ह्यातील सर्वांना तो बाबा रामदेव यांच्या सोबत स्टेजवर राष्ट्र गीत व वंदे मातरम् म्हणणारा सर्वात कमी वयाचा मुलगा म्हणून परीचित होता. त्यानंतर विश्व विक्रमांची हॅटट्रिक करणारा मुलगा म्हणून परीचित होता. त्याने जवळपास आठ महीन्याय पाच विश्वविक्रम प्रस्थापित केले. आता सहावा विश्वविक्रम प्रस्थापित करताना पहिला विश्वविक्रम मोडीत काढून एक मिनिटात 85 विविध देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुध्दा मोडीत काढलेला आहे.
 
विवानच्या या कर्तृत्वाची दखल तमीळ विद्यापिठाने घेतली. या कार्यक‘माच्या अध्यक्षपदी विद्यापिठाचे चान्सलर होते. तसेच बिग बॉस फेम आणि अभिनेत्री अभिरामी, बिग बॉस फेम आणि अभिनेत्री नित्या देजू, डॉ बालकि‘ष्णन आदी होते. सतत विश्वविक‘म करणारा हा मुलगा असल्याने त्याला 25 ऑगस्ट ला चेन्नई येथे ”डॉक्टरेट” ही पदवी देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी त्याला युनिव्हर्सल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि फ्युचर कलाम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांचे प्रमाणपत्र , मेडल्स रेकॉर्ड बॅच देऊन गौरविण्यात आले. परत त्याने जगात अनसिंग, वाशीम जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव पुन्हा एकदा रोशन केले आहे.यामुळे त्याचं सर्व दुर कौतुक केले.
 
विवानने आतापर्यंत केलेले रेकॉर्ड
कमी वेळेत स्टेजवर हजारो लोकांसमोर सर्वात कमी वयात राष्ट्रगीत म्हणून दाखवणारा मुलगा * वेळेत स्टेजवर हजारो लोकांसमोर सर्वात कमी वयात वंदे मातरम् म्हणणारा * सर्वात कमी वयात जगातील 202 देशांचे झेंडे ओळखणारा * सर्वात कमी वयात आणि कमी वेळात 100 देशांचे झेंडे ओळखणारा * सर्वात कमी वयात एक मिनिटात जास्तीत जास्त देशांचे झेंडे ओळखणारा * सर्वात कमी वयात एक मिनिटात 85 देशांचे राष्ट्रीय ध्वज ओळखणारा मुलगा.