सेम टू सेम अक्षय

    दिनांक :29-Aug-2019
असं म्हणतात की जगात एकसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात. अनेक वेळा हा प्रत्ययही खूप जणांना येतो. सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे येथे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतो. त्यातच जर एखादी व्यक्ती कोणत्या सेलिब्रिटीसारखी दिसत असेल तर पाहायला नको. आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींच्या डुप्लिकेटचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, अनिल कपूर, देवानंद, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांच्या डुप्लिकेटचे फोटो पाहायला मिळाले. सध्या अभिनेता अक्षय कुमारच्या डुप्लिकेटचे फोटो व्हायरल होत आहेत.
 
 
 
 
 
हुबेहूब अक्षयसारखा दिसणारा हा व्यक्ती काश्मिरी असून त्यांचं नाव माजिद मीर असं आहे. सध्या ट्विटरवर त्यांचा फोटो व्हायरल होत असून अनेकांनी त्यांची तुलना अक्षयशी केली आहे. एका पत्रकारानेच माजिद यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. माजिद हे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे चाहते असल्याचं म्हटलं जात आहे. पण नेटकऱ्यांनी अक्षय कुमारच्या बायोपिकमध्ये ते भूमिका साकारू शकतात अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
 
‘सुनील गावसकर यांचं तर ठाऊक नाही पण तू अक्षय कुमारच्या बायोपिकमध्ये नक्की झळकू शकतोस,’ असं एका युजरने म्हटलंय. तर काहींनी अक्षय म्हातारपणी हुबेहूब असाच दिसेल असं म्हटलंय. काहींनी तर चक्क अक्षय कुमारला टॅग करून हा तुमचा भाऊ आहे का, असा प्रश्न विचारला आहे.