नेहाने सोडले साखरपुड्याच्या चर्चांवर मौन

    दिनांक :29-Aug-2019
अभिनेत्री नेहा पेंडसेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टायलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसेच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. मात्र काही दिवसांपूर्वी तिने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
 
 
 
नेहाने एका व्यक्तीसोबतचा रोमँटिक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होतो आणि त्यासोबत हार्टचं सिम्बॉल टाकले होते. हा फोटो इटलीत काढण्यात आला होता. या फोटोत तिच्या बोटात रिंग देखील पाहायला मिळत होती. तिचा हा फोटो आणि रिंग पाहून तिची एगेंजमेंट झाल्याचे म्हटले जात होते. या फोटोची मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. पण या चर्चांवर नेहाने मौन राखणेच पसंत केले होते. पण आता नेहाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिचा साखरपुडा झाला नसल्याचे म्हटले आहे.
नेहाने इंडिया टुडेला नुकतीच मुलाखत दिली असून तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने या मुलाखतीत म्हटले आहे की, मी शार्दुल सोबत नात्यात आहे. पण आमच्या दोघांचा अद्याप तरी साखरपुडा झालेला नाहीये. आमच्या नात्याबाबत जास्त काहीही सांगण्याची ही योग्य वेळ नाहीये. मी योग्य वेळ आल्यानंतर याविषयी नक्कीच सांगेन. मी आता माझ्या फॅन्सना एवढेच सांगू इच्छिते की, मी आणि शार्दूल नात्यात आहोत.
शादुर्ल सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या फोटोत नेहाला आपल्याला त्याच्या कुटुंबियांसोबत पाहायला मिळत आहे. यावरून या दोघांच्या नात्याला शार्दुलच्या कुटुंबियांचा देखील हिरवा कंदील असल्याचे म्हटले जात आहे.
नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता. केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
नेहाने अनेक मराठी तसेच हिंदी मालिका, चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करण्याआधी तिने दक्षिण भारतीय चित्रपटांमधून देखील काम केलं होतं. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी या मालिकेत तिने सहनशील गृहिणीची भूमिका केली होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती.