प्रभास करणार अमेरिकनशी लग्न?

    दिनांक :03-Aug-2019
तमिळ सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहूबली’ चित्रपटानंतर त्याचे संपूर्ण जगभरातील चाहता वर्ग मोठा आहे. आता प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. प्रभास लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच असणार आहे.

 
 
 
‘टॉलिवूड.नेट’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानूसार प्रभास अमेरिकेतील एक दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार आहे. ‘मला माझ्या खाजगी आयुष्यावर बोलायला आवडत नाही. मला माझ्या लग्नाबद्दल काही प्रश्न विचारु नका. पण जेव्हा मी लग्न करेल तेव्हा सर्वांना आवरजून सांगेल’ असा खुलासा प्रभासने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. प्रभासने त्याच्या लग्नावर बोलणे टाळले असले तरी त्याच्या घरातल्यांनी त्याचे लग्न जमवले आहे. प्रभास अमेरिकेतील एका दिग्गज उद्योगपत्याच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
याआधी प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. परंतु प्रभास आणि अनुष्काने त्यांच्या नात्यावर उघडपणे बोलणे टाळले होते. त्यांना त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताच ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’ असा खुलासा त्यांनी यापूर्वी केला होता.
सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘साहो’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात प्रभाससह अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडेदेखील झळकणार आहेत. साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते.