रानू मंडल :सोशल मीडियानं जिचं उजाडलं नशीब!

    दिनांक :30-Aug-2019
दीपक वानखेडे 
 
नशीब केव्हा उजाडेल याचा नेम नाही, आयुष्य जगताना कोणत्याही परिस्थितीत माणसानं समोर आलेल्या संकटांशी लढत जीवन जगलं पाहिजे, मग एक ना एक दिवस आपण या आकाशाएवढं उंच होणार, हे नक्की!
सुरुवातीला ‘एक प्यार का नगमा है!’ आणि आता ‘तेरी मेरी कहानी!’ या गाण्यांच्या सध्या सोशल र्मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून या दिवसांत चर्चेत असलेली राणू मडल हिच्या जीवनाकडे पाहिल्यास आपल्याला हीच बाब शिकायला मिळते. 
 
 
रानू तिच्या उदरनिर्वाहाकरिता पश्चिम बंगालच्या रानाघाट येथील एका स्टेशनवर भीक मागत असताना ‘इक प्यार का नगमा है!’ हे गाणं सुरात गात होती. लता मंगेशकर यांच्या आवाजाशी मिळता जुळता स्वर असणार्‍या रानूच्या गाण्याकडे अिंतद्र तिवारी या प्रवाशाचं लक्ष गेलं. तिचं गाणं ऐकताना त्याला, ती इतकं छान गातेय्‌, हे पाहून खूपच आश्चर्य वाटलं. त्या आश्चर्यापोटीच या प्रवाशानं रानूच्या त्या गाण्याचा व्हिडिओ बनवून 21 जुलै रोजी तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
 
‘न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर’ आणि ‘पॅनिक अटॅक’ने पीडित असणारी आणि कोलकात्यावरून 80 किलोमीटर दूरवर असणार्‍या रानाघाटच्या बेगोपारा या गावात तुटक्या घरात राहणारी रानू हा व्हिडिओ व्हायरल होताच भारतीयांच्या घराघरांत पोहोचली. अशातच रानू देशभर चर्चेत आली असताना ‘सुपरस्टार सिंगर’ या शोमध्ये तिला येण्याची संधी मिळाली. ‘इक प्यार का नगमा है!’ हे गाणं या शोमध्ये तिनं पुन्हा गायिलं. या दरम्यान संगीतकार हिमेश रेशमिया यांनी तिच्या गाण्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या फिल्ममध्ये रानूला गाण्याकरिता आमंत्रित केलं.
 
बोलल्याप्रमाणे हिमेश रेशमिया यांनी ‘हॅपी हार्डी ॲण्ड हीर’ या सिनेमात रानूला ‘तेरी मेरी कहानी!’ हे गाणं गायला संधी दिली.
या गाण्याचा व्हिडिओ आता देशभर व्हायरल झाला असून व्हॉट्‌स ॲप आणि फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडिओ आता प्रत्येकाजवळ पोहोचला आहे.
 
काल परवा एका रेल्वे स्टेशनवर भीक मागणार्‍या रानूचा आज बॉलिवूडमधील एक नामांकित गायिका होण्याकरिता प्रवास सुरू झालाय्‌. तिला शुभेच्छा देऊयात.