मालेगाव येथे 30 किलो गांजा जप्त

    दिनांक :30-Aug-2019
मालेगाव,
मालेगाव येथे काल, 29 ऑगस्ट रोजी पोलिसांनी साडेतीन लाख रुपयाचा 30 किलो गांजा जप्त केला असून, चार आरोपींना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 4.30 वाजता दरम्यान अकोला चौकात चार संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता सै. नाशीर (वय 23), योगेश पानभरे (वय 20), रेखा कालापाड (वय 30) व संगीता पाईकराव (वय 39) सर्व रा. मंगरुळनाथ यांच्या जवळ थैलीत असलेला 30 किलो गांजा जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास मालेगाव पोलिस करित आहे.