दोन चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्या

    दिनांक :30-Aug-2019
वर्धा, 
नजीकच्या भुगाव लॉयड स्टील वसाहतीत ६ महिन्यापूर्वी नागपूर येथून राहायला आलेल्या आशिष साहू याची पत्नी सविता (३४) हिने दोन मुलांसह आत्महत्या केली. ही घटना आज ३० रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुगाव लॉयड स्टील कँपणीत अभियंता असलेला आशिष साहू ६ महिन्यापूर्वी नागपूर येथून भुगाव येथे नोकरीसाठी आला. आज ३० रोजी सकाळी आशिष कामावर गेल्यानंतर सविताने आधी आयुष्य (९), आरोह (३) या दोन मूलांना मारले. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
 
 
 
आत्महत्या करण्यापूर्वी सविताने पती आशिषला एक एसयमएस केला होता. तो एसएमएस एक तासा नंतर वाचला तसाच तो घरी परतला. घराचे दार आतून बंद असल्याने शेजारच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश करताच दोन्ही मुलं खाली पडून होते तर सविता लटकलेली दिसली. मुलांना ताबडतोब रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसात देताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मोबाईल जप्त केला असून तो एसयमएस काय होता हे मात्र पोलिसांनी सांगितले नाही. मुलांना गळा आवळून मारले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या आत्महत्यचे कारण कळू शकते नाही.