व्यापार्‍यांनी सबका विश्वास योजनेचा लाभ घ्यावा

    दिनांक :31-Aug-2019
अकोला,
‘सबका विश्वास’ या योजने अंतर्गत वारसा विवाद निवारण प्रक्रियेनुसार सर्व श्रेणीतील प्रलंबित प्रकरणांत दिलासा मिळणार आहे. ’ व्याज नाही, दंड नाही, फिर्याद नाही’ या घोषणेनुसार व्याज, दंड व खटला यांत पूर्ण सूट तसेच करात देखील मोठी सवलत असेल, तसेच वारसा विवाद प्रकरणांत या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. 
 
 
ही योजना 1 सप्टेंबर 2019 पासून सुरु होत असून चार महिने कार्यान्वित असणार आहे. जीएसटी संदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया विविध स्तरांतून येत आहेत. ज्यांच्या प्रतिक्रिया व अपिलांची 30 जून 2019 पर्यंत सुनावणी झाली आहे, जे कोणत्याही करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले आहे, ज्यांना परताव्यासाठी शो-कॉज नोटीस बजावण्यात आली आहे अशा करदात्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेची सविस्तर माहिती जीएसटी व सेंट्रल एक्साइज विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेल्यानंतर आर्थिक ’क्रेडिबिलिटी’ वर नकारात्मक परिणाम होणार नाही.