बिचुकलेला 'आता माझी सटकली' अवॉर्ड

    दिनांक :31-Aug-2019
बिग बॉसच्या घरातील आता शेवटे दोन दिवस शिल्लक आहेत. हे शेवटचे दिवस सदस्यांच्या आठवणीत राहावे यासाठी बिग बॉसनी खास 'बिग बॉस अवॉर्ड्स' चं आयोजन केलं होतं.या अनोख्या 'बिग बॉस अवॉर्ड्स नाइट'नं धम्माल उडवून दिल्याचं पाहायला मिळालं. घरातील आजी-माजी सदस्यांनी हा टास्क अगदी मजा-मस्ती करत सुरू केला.

वैशालीच्या 'आज की रात' या गाण्यानं पुरस्कार सोहळ्याचा शुभारंभ झाला तर आरोह वेलणकरनं पुरस्कार या अवॉर्ड सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. या सोहळ्यात सर्वात पहिला 'सर्वोत्कृष्ट आता माझी सटकली अवॉर्ड' हा पुरस्कार अभिजीत बिचुकलेंना देण्यात आला. या पुरस्कारासाठी नेहा, शिवानी आणि बिचुकले यांना नामांकनं मिळाली होती. पण घरातीस सर्व सदस्यांचं एकमत झालं आणि शिवानीकडून बिचुकलेंना 'आता माझी सटकली अवॉर्ड' हा पुरस्कार देण्यात आला.