२१ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

    दिनांक :31-Aug-2019
 
 
कारंजा लाड,
कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काजळेश्‍वर येथे एका 21 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. रवी सुर्वे असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. मृतक रवी हा काजळेश्‍वर येथे आपल्या आई वडिलांसोबत राहत हेाता. त्याने काजळेश्‍वर विराहित रस्त्यावरील शेख मुजम्मील यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृतकाच्या वडिलाच्या फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळु शकेले नाही.