'पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा'

    दिनांक :04-Aug-2019
मुंबई,
ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत, येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना माहित आहे की विधानसभा निवडणुकीत ते जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी महामोर्चा काढण्याचे ठरवले असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री यांनी लगावला आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. 
 
 
आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. येणाऱ्या २१ तारखेला ईव्हीएमला विरोध म्हणून सर्वपक्षीय महामोर्चा सुद्धा काढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा दरम्यान विरोधकांच्या निघणाऱ्या मोर्चावर टीका केली आहे. विरोधकांना लक्षात आले आहे की, त्यांना यावेळीही जिंकता येणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच ईव्हीएम- ईव्हीएम बोलून, पुढे मिळणाऱ्या ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी २१ तारखेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
महामोर्चानंतर ही काहीच होणार नसून, त्यानंतर ही विरोधकांचा महापराभवच होणार असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले. प्रचंड मोठी गळती त्यांच्याकडे लागली आहे. त्यांनी आत्मचिंतन करायले हवे की, त्यांच्याकडे कुणीच राह्यला का तयार नाहीत. आम्ही पक्ष सोडणार नाहीत अशी शपथ देण्याची वेळ विरोधकांवर आली असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.