पावसामुळे अनेक मालिकांचे शुटिंग रद्द

    दिनांक :04-Aug-2019
मुंबई,
गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या पावसाचा फटका टीव्ही इंडस्ट्रीलाही बसला आहे. मराठी टी.व्ही इंडस्ट्रीमधील बहुतांश मालिकांचे शुटिंग रद्द करण्यात आले आहे.

 
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे सुरू असलेल्या 'फुलपाखरु', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' या मालिकांचे शूट रद्द केलं आहे. मीरा रोड येथे सुरू असलेल्या 'तू अशी जवळी राहा' या मालिकेच्या लोकेशनलाही पावसाचा फटका बसला आहे. तर, 'साजणा' या मालिकेतील कलाकार आणि कर्मचाऱ्यांना सेटवर पोहचण्यासाठी उशीर झाल्यानं या मालिकेचं पॅक अप केलं आहे.
मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला तर मालिकांचे आर्थिक गणित गडबडणार हे नक्की आहे.