आमीर खान बनणार खलनायक

    दिनांक :05-Aug-2019
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट हा ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच ते या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही तो व्यस्त आहे. ‘लाल सिंग चढ्ढा’चित्रपटाची शूटिंग संपल्यावर तो तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची शूटिंग सुरू करणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल, अशी चर्चा आहे.

तमिळ चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये आमिरसोबत आणखी एक खान दमदार भूमिकेत दिसणार आहे. तो म्हणजे बॉलिवूडच्या पतौडी खानदानाचा नवाब सैफ अली खान. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमिर खानला विचारल्यानंतर सैफ अली खानला विचारले आहे. सैफ यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तमिळ व्हर्जन ‘विक्रम वेधा’ चित्रपटाला गायत्री पुष्कर दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आर.माधवन दिसला होता. त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावली होती. तर खलनायकाची भूमिका विजय सेतुपाठी यांनी केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
तमिळ चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या बाबतीत अजून तरी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, याबाबतीत लवकरच निर्मातेमंडळी घोषणा करतील, अशी आशा आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा निर्माता नीरज पांडे असणार आहेत.