मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड

    दिनांक :05-Aug-2019
 तीन मटका विक्रेत्याला अटक, एक फरार
 
आरमोरी, 
मिळालेला माहितीनुसार महात्मा फुले वार्डमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा पट्टी मटकाचा व्यावसायिक सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांना मिळ्याल्यानंतर तात्काळ तात्काळ अधिकारी व पोलिसांचे पथक तयार करून गोपनीय आधारे पोलीस उपनिरक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शन खाली मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली, यामध्ये फुले वार्ड च्या बाजूला एका दुकानाच्या खोलीत लोंकांची गर्दी व ये-जा करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले सदर ठिकाणी तीन इसम दुकानात खुर्ची बसून टेबलावरती लोकांकडून पैसे घेऊन त्याला कागदी चिट्या वर सट्टा पट्टीचे आकडे लिहून देऊन पैशाचा हार-जीत खेळ खेळत असल्याचे दिसून आले. यावेळी चंदू पितांबर अलोणे वय , छबिलदास पेंदाम, मिलिंद विनायक खान्देशकर यांना पोलिसांनी जागेवरच ताब्यात घेतले व पंचनामा दरम्यान पोलसांच्या चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून सट्टा पट्टटी घेणाऱ्या मुख्य आरोपी आशिष राजेश जोथ यांच्या नावा खाली हा सट्टा पट्टीचा व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. यावरून पोलसानी मुख्य आरोपीसह इतर चौघांविरुद्ध कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले व 3180 रुपये व सट्टा पट्टीचे कागद पेन आदी साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली असून आशिष जोथ फरार आहे. या मध्ये आणखी यांच्या सोबतीला दोन साथीदार असल्याचे माहिती आहे पोलसानी दिली असून त्यांचा शोध सुरु आहे, तर ठाणेदार सुरेश चिल्लावार यांनी अवैद्य दारू व मटका व्यावसायिक वर धाड सत्र मोठया प्रमाणात राबवित असल्याने अवैद्य धंदे वाल्यानेचे धाबे दणाणले आहेत, सदर मटका कारवाई ठाणेदार सुरेश चिल्लावार,  बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हवालदार केशव केंद्रे, गौतम चिकनकर यांनी केली