काश्मीर प्रकरणी निकालानंतर अहेरीत जल्लोष

    दिनांक :05-Aug-2019
अहेरी, 
केंद्रातील मोदी सरकारने आज जम्मू काश्मीर मधून 370 व 35 A हा कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला,हा निर्णय घोषित होताच अहेरी येतील मुख्य चौकात भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, अ.भा.वि.प. तसेच व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून व मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी नारेबाजी ही करण्यात आली.