काश्मीरला भारतापासून तोडण्याचे मनसुबे धुळीस मिळाले: मुख्यमंत्री

    दिनांक :05-Aug-2019
चंद्रपूर,
"जहाँ हुये बलिदान बलिदान मुखर्जी, वो काश्मिर हमारा है", असे आम्ही जे सातत्याने म्हणत आलो आहे, ते स्वप्न आज, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केले आहे. लोकसभेत ३७० कलम रद्द करण्यावर मोहर लागली आहे. राज्यसभेत चर्चा सुरू आहे. तेथेही हा ठराव पास होईल. काश्मिरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम काँग्रेसची खूप मोठी चूक होती. ती आज कालबाह्य ठरत आहे. काश्मिर भारताचा अविभाज्य अंग आहे आणि तो कायम राहणारच. आता काश्मिरला भारतापासून तोडण्याचा पाकिस्तानचा मनसुबा कायमचा धुळीस मिळाला आहे. आता काश्मिर खऱ्या अर्थाने भारताचा अंग होईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचे अभिनंदन केले.
ते चंद्रपूरच्या सभेत बोलत होते.