काश्मिरी मुलीसोबत लग्न करणार

    दिनांक :05-Aug-2019
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची शिफारस राज्यसभेत केल्यानंतर काहींनी स्वागत तर काहींनी विरोध केला आहे. देशभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जम्मू काश्मीरच्या सध्याच्या परिस्थितीवर अभिनेता कमाल राशीद खान उर्फ केआरकेने एक ट्विट केले असून ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
 

 
 
आता जर एखाद्या काश्मिरी मुलीने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला किंवा ती माझ्याशी लग्न करण्यास तयार झाल्यास मी काश्मीरमध्ये एक मोठा बंगला खरेदी करण्यासाठी तयार असेल, असे ट्विट केआरकेने केले आहे. चला, पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या स्वर्गात एक चांगले आयुष्य जगूया, असं केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. कमाल खानने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलंय की, मला मोदी राज पसंत नव्हते. कारण ते आपले आश्वासन पूर्ण करीत नव्हते. आता मात्र ते मला आवडले आहे. कारण, ते आश्वासन पूर्ण करीत आहेत. तसेच त्यांनी कलम ३७० नष्ट केले आहे. मोदींनी जर राम मंदिराचे दुसरे आश्वासन पाळले तर मी त्यांचा आणखी चाहता होईल, कारण लोकांनी त्यांना या आश्वासनासाठी निवडून दिले आहे.
 
 
 
काश्मीरप्रश्नी लोकांनी मुस्लिमांवर संशय घेऊ नये. एकही मुस्लिम कलम ३७० विरोधात नाही. मुस्लिमांना त्या ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी नाही. मुस्लिमांना काश्मिरी मुलीसोबत लग्न करण्याची परवानगी नाही. म्हणजेच काश्मिरी मुस्लिमांचा आम्हाला विरोध आहे, असेही केआरकेने ट्विटमध्ये म्हटले आहे.