'या' व्यक्तीसोबत केले राखीने लग्न

    दिनांक :05-Aug-2019
मुंबई,
ड्रामा क्वीन राखी सावंतचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राखीनं लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर राखीनंच मी लग्न केलं नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आपल्या एका विधानावर ठाम राहील ती राखी कसली. राखीचे पुन्हा नववधुच्या वेषातील फोटो समोर आल्यानंतर तिनं स्वतः लग्न केलं असल्याची कबुली दिली आहे. मोजक्याच नातेवाईंकाच्या उपस्थितीत राखीनं एनआरआय मुलासोबत लग्नगाठ बांधली आहे.
 
 
 
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राखीनं तिच्या लग्नाचं वृत्त खरं असल्याचं सांगितले. 'होय मी खरंच लग्न केलं आहे, मी लग्न केलं हे सगळ्यांपासून लपवले कारण मी घाबरली होती. माझ्या पतीचं नाव रितेश आहे आणि ते लंडनला असतात. लग्न झाल्यानंतर ते लगेच लंडनला रवाना झाले, मात्र माझ्या व्हिसाचं काम अपूर्ण असल्यानं मी काही दिवसांनंतर त्यांच्याकडं जाणार आहे.' असं राखीनं सांगितलं आहे.
'माझी एक मुलाखत पाहून रितेशनं मला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. नंतर आमच्यात मैत्री झाली. आमची मैत्री झाल्यानंतर मी नेहमी देवाकडं मला यांच्यासारखाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करायचे आणि देवानं माझी ती इच्छा पूर्ण केली. आम्ही मोजक्याच नातेवाईंकाच्या उपस्थितीत लग्न केलं.' असा खुलासा राखी सावंतन केला आहे.